संत एकनाथ - भारूड
संत एकनाथ - भारूड संत एकनाथ यांचा जन्म इ . स . 1533 मध्ये पैठण या ठिकाणी झाला . असे मानण्यात येते . एकनाथांच्या घरात भागवतभक्ती अनेक पिढयांची होती . त्यामुळेच त्यांच्या कार्यात भागवतभक्ती अवतरली संत एकनाथ मोठे बुद्धी मान आणि श्रद्धावान होते . वारकरी संप्रदायात संत एकनाथांच्या लेखनाचे वै शिष्टयपूर्ण स्थान आहे . वारकरी संप्रदायाच्या प्रसार आणि प्रचारात त्यांचे खूप मोठे योगदान आहे . देवगिरीच्या यादवांची राजवट सम्पल्यांनातर महाराष्ट्रावर सतत इस्लामी आक्रमणे झाली . देवळे नष्ट झाली . भोंदूचा संस्कृती , भाषा या सर्वांवर परिणाम झाला . गुरूंचे प्रस्थ वाढले लोक धर्मांतर करू लागले . अशा काळात संत एकनाथांनी हिंदूंची धर्मभावना जागृत केली . भक्तिमार्गाचे पुनर्जीवन केले . समाजाला रुचेल , पचेल अशा सोप्या भाषेत त्यांनी समाजाच्या प्रत्येक वर्गाचा विचार करून ग्रंथरचना केली . नाथांनी जातीभेदाचे निर्मुलन करण्...